पुणे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओने फिचर फोन बुकिंग सुरू केले. मात्र अवघ्या काही वेळातच या प्री-बुकिंगची वेबसाइट डाउन झाली. शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. हाच मुहूर्त साधत गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेपासून जिओने फिचर फोन ग्राहकांसाठी प्री-बुकिंग सुरू केले. मात्र, सायंकाळी 6 वाजेनंतर ही वेबसाइट डाउन झाली. मोबाइल नंबर टाकल्यानंतर ऑनलाइन पैसे द्यावे लागतात. त्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना मात्र मन:स्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.