नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या प्राइम मेंबरशिप योजनेची अंतिम मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच 15 एप्रिलपर्यंत 303 रुपयांचे रिचार्ज केल्यास तीन महिने सर्व सेवा मोफत वापरण्यात येणार आहेत. प्राइम मेंबरशिपअंतर्गत ग्राहकांना एकदाच 99 रुपये भरून सध्याचे फायदे मार्च 2018 पर्यंत मिळविता येणार आहेत. याoची मुदत 31 पर्यंत यापूर्वी होती. मात्र, आता ती 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच जिओ समर सरप्राईज ऑफर सादर करण्यात आली आहे.
चार आठवड्यात दोन कोटी ग्राहक
मासिक भाडे भरून ग्राहकांना हॅपी न्यू ईयर योजनेचा फायदा घेता येणार आहे. यासाठी बारा महिन्यांचा नवा प्लॅन असणार आहे. ग्राहकांनी प्राइम मेंबरशिप न घेतल्यासही त्यांना व्हाईस कॉल मोफत आणि रोमिंग नि:शुल्क असणार आहे. ’जिओ’च्या प्राइम मेंबरशीपमध्ये 7.2 कोटी ग्राहकांनी उत्सुकता दर्शविल्याचे सांगण्यात आले. गेल्या चार आठवड्यांत रिलायन्स जिओकडे 2 कोटी नव्या ग्राहकांची नोंद झालेली असून, रिलायन्स जिओने 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहकांचा आकडा पार करत उच्चांक गाठला आहे.
काय आहे जिओ समर सरप्राईज ऑफर
जिओची प्राइम मेंबरशीप घेतलेल्या ग्राहकांनी 15 एप्रिलपर्यंत 303 रुपयांचे रिचार्ज केल्यास त्यांना पुढील तीन महिने सर्व सेवा मोफत वापरण्यात येणार आहेत. त्यांना पुढील रिचार्ज जुलैमध्ये करावा लागणार आहे.