जिओजितखने जाहीर केला नव्या ब्रॅण्ड

0

मुंबई । वित्तीय सेवांमधील मध्यस्थ म्हणून काम करणारी जिओजित ही अग्रेसर कंपनी असून या कंपनीने आज आपल्या ब्रॅण्डनावात केलेला बदल अधिकृतरित्या जाहीर केला. तसेच, या कंपनीच्या परिचालनाला सुरूवात होऊन तीस वर्षे झाल्याची माहिती देणारा विशिष्ट लोगोही नव्याने बनवण्यात आला आहे, त्याचेही अनावरण यावेळी करण्यात आले.

या कंपनीचे नवे नाव जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस असे ठेवण्यात आले असून बीएनपी परिभास या वित्तीय संस्थेशी या कंपनीने संगनमत करून भागीदारी करार संमत केला आहे. केरळ राज्य औद्योगिक विकास महामंडळ (केएसआयडीसी) आणि राकेश झुनझुनवाला यांसह ही फ्रेंच बहुराष्ट्रीय बँकही अत्यंत महत्वाचे भागीदार म्हणून यापुढेही कार्यरत राहणार आहे. जिओजितचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सी. जे. जॉर्ज यांच्या उपस्थितीत जिओजितचे अध्यक्ष ए.पी. कुरीअन यांनी कंपनीच्या नव्या लोगोचे अनावरण केले. याप्रसंगी कंपनीचे कार्यकारी संचालक सतीश मेनन आणि जिओजित टेक्नॉलॉजीज् लिमीटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ए. बाळकृष्णन यांसह कंपनीतील इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.