जिओतच जान…..

0

मुंबई : मोबाईल कंपन्यांचे ऑफर युद्ध थांबायचे काही नाव घेत नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये जिओने फ्री अमर्याद इंटरनेट आणि कॉल सेवा अशी टाकलेल्या ठिणगीचा आता वणवा पेटला आहे. व्होडाफोन, भारती एअरटेल, आयडीया आदी कंपन्यांना रिलायन्सचा वारू रोखता आलेला नाही.

जिओच्या ऑफऱनंतर टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांची झोप उडाली. जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन यांच्यापुढे त्यांचे ग्राहक टीकवून ठेवण्याच आव्हान उभे राहिले. या मजबुरीमुळे व्होडाफोन कंपनी नवा प्लान घेऊन बाजारात उतरली आहे. ७० दिवसांसाठी केवळ २४४ रूपये भरून रोज फोर जीचा एक जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. व्होडाफोनचा नवा प्रिपेड प्लान फर्स्ट रिचार्ज कुपन असा ओळखला जाणार असून तो नव्या प्रिपेड ग्राहकांनाच मिळणार आहे. यात अमर्याद एसटीडी आणि लोकल कॉल असले तरी व्हॉइस कॉलिंग फक्त व्होडाफोन नेटवर्कसाठीच आहे. हा मोठा अडथळा व्होडाफोनच्या ऑफरमध्ये आहे. दुसरे असे की पहिल्या रिचार्जसाठी ७० दिवस व्हॅलिडिटी असलेली ही ऑफर दुसऱ्या रिचार्जच्या वेळी ३५ दिवसांवर येणार आहे. व्होडाफोनची जुन्या ग्राहकांना ऑफर – ३४६ रुपयांचा प्लान, ५६ दिवस फोर जीचा प्रति दिन एक जीबी डेटा, फ्री व्हॉइस कॉल्स कोणत्याही नेटवर्कवर ३०० मिनिटे पाच तास प्रति दिन आणि १२०० मिनिटे प्रति आठवडा.

भारती एअरटेलची ऑफर – २४४ रूपये रिचार्ज, १ जीबी डेटा, ७० दिवस, अमर्याद एसडी व लोकल कॉल्स. प्रत्येक आठवड्याला फ्रि कॉल ३०० मिनिटे फक्त एअरटेल टु एअरटेल कॉल्स, इतर नेटवर्कवर १२०० मिनिटे फ्रि कॉल…

जिओची ऑफर – ३४९ रुपयांचा प्लान, फोरजी चा एक जीबी डेटा आणि फ्रि व्हॉइस कॉलिंग कोणत्याही नेटवर्कवर ५६ दिवसांसाठी. आधी हा प्लान ३८ दिवसांसाठीच होता. एफयुपी मर्यादा उल्लंघिल्यावर इंटरनेट स्पीड १२८ किलोबाईट पर सेकंद इतका वेग होणार आहे. जिओचे ३०९, ५०९ रूपयांचे प्लानही आकर्षक आहेत. त्यातही अमर्याद कॉल आहेत.

सध्या तरी जिओच्या तुलनेत अन्य कंपन्यांनी दिलेल्या ऑफऱ अनेक अटी शर्ती टाकताना दिसत आहेत. चोखंदळ ग्राहक आता ऑफरच्या मागील नफेखोरीकडे लक्ष देऊन परवडेल अशाच कंपनीला प्रतिसाद देताना दिसत आहेत.

आरकॉमचा नवा प्लान
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉमने) प्रीपेड ग्राहकांसाठी खास 193 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये आरकॉमच्या ग्राहकांना 193 रुपयांमध्ये 28 दिवस दररोज 1जीबी डेटा मिळेल. तर व्हॉईस कॉलिंगसाठी दररोज एसटीडी आणि लोकल 30 मिनिटे मिळणार आहेत.