मुंबई । जिओनीने नवीन ए1 लाईट मोबाईल फोन 14,999 या किमतीत बाजारात उतरविला आहे. 4000 एमएच बॅटरी, जलद फिंगर प्रिंट सेन्सर आणि 20 मेगा पिक्सल कॅमेरा हे या फोनचे वैशिष्ट्य आहे. सर्व रिटेल स्टोअर्स मध्ये हा फोन 10 ऑगस्टपासून 2 वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसहित गोल्ड आणि ब्लॅक रंगात उपलब्ध असेल.
जिओनी इंडियाने सेल्फी आणि बॅटरी साठी सरस क्षमता देणारे स्मार्टफोन आजवर बाजारात आणले आहेत. त्यांच्या ए1 मालिकेच्या अंतर्गत ए1 लाईट हा स्मार्टफोन आहे. 5.3 इंच बॉडी असल्याने तो हलका आहे. संपूर्ण दिवस एका चार्जिंगवर निघतो. गोरिला ग्लासची जोड आहे. स्प्लिट स्क्रीनमुळे चांगला युजर एक्स्पीरियंस मिळतो आणि एकावेळी जास्त कामे करता येतात. ए1 प्रमाणेच ए1 लाईट मध्येही सुरक्षेसाठी अत्यंत जलद फिंगरप्रिंट सेन्सर आहे ज्यामुळे फोन फक्त 0.3 सेकंदात फोन अनलॉक होतो. 2.5 डी कर्व्हड ग्लास, बॅक कव्हर सहित मेटालिक ग्लीम्स आणि स्लिक युनीबॉडी डिझाईन द्वारे ए1 लाईट हा दिसायला आकर्षक आणि पकडायला सोपा आहे.
सरस फोटोग्राफी क्षमता असलेल्या उच्च दर्जाच्या स्मार्टफोनची वाढती मागणी लक्षात घेऊन हा फोन बाजारात उतरवत असल्याचे जिओनी इंडियाचे संचालक अशोक श्रीवास्तव यांनी सांगितले. ड्युएल रेअर कॅमेरामुळे प्रोफेशनल दर्जाच्या प्रतिमा आणि व्हिडीओ मिळू शकतील, असा दावा त्यांनी केला. जिओनीने एअरटेल आणि पेटीएम बरोबर आकर्षक ऑफर्ससाठी भागीदारी केली आहे. ए1 लाईट विकत घेणाऱ्या नवीन किंवा सध्याच्या एअरटेल ग्राहकांना 10 जीबी डेटा 6 महिन्यांसाठी 1 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त डेटा रिचार्ज केल्यास मिळणार आहे. या बरोबरच ए1 लाईट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 पेटीएम कॅशबॅक व्हाउचर कोड्स मिळणार आहेत ज्याद्वारे ग्राहकांना रु.250 ची कॅशबॅक पेटीएम मॉल मध्ये रु.350 च्या खरेदीवर मिळणार आहे.
अद्वितीय सेल्फी
ए1 लाईटचा ही अद्वितीय सेल्फीवर भर असून त्यासाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा कस्टमाइज्ड सेल्फी फ्लॅश सहित आहे ज्याद्वारे प्रकाश चेहऱ्यावर एकसारखा आणि मृदुपणे पसरतो. जिओनीची स्वतंत्र फेशियल एन्हान्समेंट अल्गोरिदम वापरकर्त्याचा चेहरा शोधते आणि कस्टम ब्युटी सेटिंग्ज वापरते. 4 सेल तंत्रज्ञानेयुक्त असलेला फ्रंट कॅमेरा आधीपेक्षा जास्त प्रकाशाचा वापर करताना जास्त सुस्पष्ट आणि सुंदर सेल्फी देतो.
सुपर बॅटरी
इंटीग्रेटेड सोफ्टवेअर आणि हार्डवेअर सोल्युशनद्वारे 1 लाईट जास्त दीर्घ आणि अविरत असा बॅटरी अनुभव वापरकर्त्याला देऊ शकतो. 4000 एमएच बॅटरीच्या ताकदीच्या जोरावर वापरकर्त्यांना 30 तासापर्यंत कितीही वेब ब्राउझिंग, व्हिडियो कन्टेट बघितले तरीही अविरत अनुभव मिळू शकतो.
अद्वितीय अनुभव
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील सरल क्रियेमुळे जिओनी ए1 लाईट ए1 लाईट विशेष असा स्मार्टफोन अनुभव देतो. ए1 लाईट ओक्टा कोअर वर चालतो ज्याद्वारे चांगली कामगिरी मिळताना कमी बॅटरी वापरली जाते. 3 जीबी रॅम ची ताकद असलेल्या ए1 लाईट द्वारे एका वेळी अनेक कार्ये करता तर येतातच पण सहज वापरही शक्य होतो तर 3 जीबी रॅम + 32 जीबी इंटर्नल स्टोरेजमुळे (256 जीबी विस्तारक्षम) पूरक साठवण क्षमता मिळू शकते.