जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलची नवी योजना

0

नवी दिल्ली –भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्राहकांना लवकरच 149 रुपयांत महिन्याभरासाठी अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी फोन करण्याची सुविधा मिळू शकते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 जानेवारीला बीएसएनएल हा प्लान आणण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओमुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांसमोरील आव्हान वाढलं आहे. अशातच या नव्या प्लानसोबत रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसनएलला
मदत मिळेल.

अनलिमिटेड फोन कॉलच्या ऑफर
जिओच्या 149 रुपयांच्या प्लनामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड फोन कॉल, 300 एमबी डाटा आणि 100 लोकल, नॅशनल एसएमएसच्या सुविधा मिळतात. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी पत्रकारांना बोलताना सांगितेल की, आमच्या ग्राहकांसाठी 149 रुपयांच अनलिमिटेड फोन कॉलच्या ऑफरवर काम करत आहोत’, असं सांगितलं आहे. तसंच या प्लानमध्ये 300 एमबी डाटाही मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे. जिओनंतर इतक्या स्वस्तातला प्लान देणारी बीएसएनएल दुसरी कंपनी असेल. जिओ आक्रमकता धोरण दाखवत असून आम्ही त्यांचा सामना करण्यास तयार आहोत, असे अनुपम श्रीवास्तव बोलले आहेत.