‘जिओ 2’ वर आता युट्युब, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप!

0

गीगा टीव्हीबाबतही घोषणा

मुंबई । देशातील दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्‍या रिलायन्सन या कंपनीने ’जिओ’ नंतर आता आणखी एक धमाका केला आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ’जिओ 2’ या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. यू ट्यूब, वॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचे ’इनबिल्ट’ अ‍ॅप हे नव्या फोनचे वैशिष्ट्य असून, येत्या 15 ऑगस्टपासून जिओच्या ग्राहकांना त्यांचा लाभ घेता येणार आहे. याचबरोबर अंबांनी यांनी गीगा टीव्हीबाबतही घोषणा केली आहे. गिगा टीव्हीच्या सेट टॉपबॉक्समध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड असतील. गीगा फायबर सेवेची घोषणा, गीगा फायबर सेवा 1001 शहरांमध्ये एकाच वेळी सुरु करणार असल्याचेही मुकेेश अंबानी यांनी जाहीर केले.

भारताचे वेगवान नेटवर्क
जिओ सर्वदूर पसरले आहे. आणि कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करताही गेल्या काही महिन्यात जिओची क्षमता दुपटीने वाढली आहे. जिओ आणि रिटेल क्षेत्राची वाढ 2 वरून 13 टक्क्यांवर गेली आहे. जिओचे सध्या 215 दशलक्ष (21 कोटी 50 लाख) युजर्स आहेत. दररोज जिओवर 240 कोटी जीबी डेटाचा वापर होतो. भारतातले सर्वात वेगवान नेटवर्क म्हणून पहिले स्थान जिओने कायम ठेवले आहे, अशी माहिती यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली.

जिओ गिगा फायबर
रिलायन्स सध्या दहा हजार घरांवर जिओ गिगा फायबरची चाचणी करत आहे. येत्या 15 ऑगस्टपासून जिओ गिगा फायबरची नोंदणी सुरू होणार आहे. रिलायन्सचा नवा जिओ फोन 2 अनेक वैशिष्ट्यपूर्ण फिचर्ससह लॉन्च होत आहे. जिओ फोन मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जिओ युजर्स अवघ्या 501 रुपयांमध्ये त्यांचा जुना फोन बदलू शकणार आहे.