जळगाव । अंकुर प्रतिष्ठान व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशनतर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त कांताई सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. एच.आय.व्ही.सह जगणार्यांसाठी कापडी पिशव्या शिवून घेतल्या, संक्रांतीसाठी डिझाईनची पतंगे, पाककलाकृतीमध्ये पुरणपोळी तयार करुन त्यांना विकण्याची पध्दत विकसीत केली.
विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे केले आयोजन
एच.आय.व्ही.सह जगणार्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केला. दिपप्रज्वलन पूनम जोशी, सरीता माळी, वैशाली कुर्हाडे, उज्वला मुथा सपना छोरीया, आयशा खान, प्रा.डॉ. अनिता कोल्हे, मनिषा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतीक कार्यक्रमात संगीता मराठे, पुष्पा मुलमुले, हिराबाई बडगुजर, संगीता न्हावी, ज्योती धनगर, अंकीता चौधरी, शितल नाईक, मनिषा बागुल, संगीता पाटील, आशा चौधरी यांनी सहभाग नोंदविला. पॉवर प्रेझेंटेशन व सुत्रसंचालन प्रविण ठाकरे यांनी तर प्रास्ताविक मनिषा बागुल यांनी केले. परीचय व स्वागत संगीता पाटील, आशा चौधरी यांनी केले.