जिजाऊ बहुद्देशिय संस्थेतर्फे व्याख्यान !

0

अमळनेर: येथील जिजाऊ बहुद्देशिय संस्थेतर्फे फिनिक्स सोशल अवेरनेस गृपचा सातवा वर्धापनदिनानिमित्त  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा जेष्ठ व्याख्याते प्रा.वसंतराव पुरके ‘तरुणाईचा जागर व प्रजासत्ताक भारताचे नैतिक मुल्य’  ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. उद्या 26 रोजी दुपारी 4 वाजता मराठा मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन जिजाऊ बहुद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस गृपतर्फे करण्यात आले आहे.