एरंडोल । येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयास शाळा सिद्धी ‘अ’ प्रमाणपत्र प्राप्त झालेले असल्यामुळे विद्यालयाची केंद्रीय व राज्यस्तरीय दोन दिवसीय शाळा सिद्धी तपासणी करण्यात आली. शाळा समितीचे सदस्य किरण रामगिर बावा व राहुल दिगंबर म्हस्के यांनी शाळेची तपासणी केली. यावेळी शाळा समितीचे सदस्य किरण बावा व राहुल म्हस्के यांनी शाळा सिद्धी बाबत माहिती दिली.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांचे अध्यक्षतेखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची राज्य निर्धारकानी सभा घेवून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका भारती पाटील यांनी विद्यालयातील सोयी सुविधा व राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती दिली. अध्यक्ष अमित पाटील यांनी शाळा सिद्धी बाबतचे महत्व सांगितले. तसेच समिती सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांची संस्थेच्या वतीने अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले. शाळा समिती सदस्यांचा संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.