जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत चर्चा

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पुन्हा ‘मातोश्री’ वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे पहिले आमंत्रण शरद पवार यांना दिले आहे. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना जितेंद्र आव्हाड आमंत्रण देणार आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली होती. मात्र, त्यावेळी या दोघांच्या भेटी मागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.