जिद्द आणि चिकाटीने माणूस धेय्य गाठू शकतो : मिल्खा सिंग

0

बालेवाडी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

पुणे : माणसाच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस त्याच्या धेय्यापर्यंत पोहचू शकतो असे मत पद्मश्री मिल्खा सिंग यांनी मांडले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला चालना देण्यासाठी बालेवाडी स्टेडीयम येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, विनायक आंबेकर आयोजक उषा वाजपेयी, श्याम सातपुते, राजीव गुप्ते, मुकुंद वर्मा, चंदन गंभीर, विक्रांत आर्य, सुवर्णा जोशी, पल्लवी कौशिक, श्रुती पटोले, सुरजित कौर यांची उपस्थिती होती.

सिंग म्हणाले, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांचे धेय्य गाठू शकले. त्यामुळे सामान्य माणसाने कधीही आपली धेय्य आणि चिकाटी सोडता कामा नये.

बेटी पढाओ बेटी बचाओ चे केले कौतुक
यावेळी मिल्खा सिंग यांनी बेटी पढाओ बेटी बचाओ या अभियानाचे कौैतुक केले. व महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे येऊन काम करावे असे सांगीतले. यावेळी उषा वाजपेयी यांचे देखील सिंग यांनी विषेश कौतूक केले. बेटी पढाओ बेटी बचाओ चा नारा देत तब्बल 5 हजार लोकांनी मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला.