चला, अधिवेशनात 4 दिवसाच्या गदारोळानंतर शेवटी जवानांच्या पत्नींच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पंढरपूरच्या आ. प्रशांत पारिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. तसेच समिती स्थापन करून या प्रकरणावर तूर्तास पडदा टाकला. सभागृहाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण याआधी विधानपरिषदेत कधीच कुठल्याही सदस्याला अशा प्रकारे सभागृहाबाहेर वक्तव्य करणाऱ्या सदस्याला निलंबित केले गेलेले नाही. खरतर पक्षाने अशा लोकांना बडतर्फ करून सदस्यत्व रद्द करून टाकायला हवे, मात्र पक्षांचेही लागेबांधे असल्याने असा आशावाद करणे हे स्वप्नवत आहे. पक्ष गुंड, खुनी आणि भ्रष्टाचारी लोकांना सांभाळून नैतिकतेच्या गोष्टी करत असतात. त्यामुळे अशा घटनेत बडतर्फी वगैरे अंधश्रद्धाच. काहीही असो, या निर्णयामुळे पारिचारकांच्या राजकीय वाटचालीवर आता मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण खुद्द त्यांच्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत ऐतिहासिक निर्णय घेत बाहेर फेकले आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “3” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]ताज्या बातम्यांसाठी लाईक करा जनशक्ति चे फेसबुक पेज [edsanimate_end]
आता एवढे घडल्यानंतर जनतेच्या मनातून आणि राजकारणातून पारिचारक यांचा विषय संपला का?, त्यांचे राजकीय आस्तित्व संपले का? या प्रश्नांवर विचार केला असता आपण अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण पारिचारक यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात जोरदार बाजी मारलेली आहे. म्हणजे एवढ्या बोगस वक्तव्यानंतर देखील लोकं त्यांच्यवर विश्वास ठेवत आहेत, हे भयानक आहे. वक्तृत्व कौशल्याचा अभाव असल्याने सभांमध्ये बोलताना आपल्या मनात येईल त्या पद्धतीने जिभेचे लोळ तोडण्याचे प्रकार आज प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सामान्यांचा माणूस, सामान्यांचे नेतृत्व आहे असे भासवून हे लोकं नेता अर्थात पुढारी बनून नंतर सामान्य लोकांवरच बोगस जोक मारत राजकीय पोळी भाजत राहतात. हे सर्व घडत असताना ही गर्दी अवतीभवतीच असते. गर्दीच्या आवेशाच्या बळावरच नेत्यांना काय बोलावे? याची जाणीव राहिलेली नाही. मात्र बोलल्यानंतर देखील लोकांच्या मेंदूला झिणझिण्या येत नाहीत हे संतापजनक आहे. लोकांची मानसिकता अशीच राहिली तर असे अनेक पारीचारक बिनधास्त फिरू शकतात.
एक मात्र पायंडा या निमित्ताने चांगला पडला आहे. आता नेत्यांना बाहेर बरळताना अशा कारवाईला सामोरे जावे लागण्याची भीती मनात बाळगून बोलावे लागणार असल्यान लगाम कसला गेला आहे. नेते, मंत्री किंवा लोकप्रतिनिधी भावनेच्या भरात म्हणा किंवा बोलायला येत नसल्याने मीडियासमोर किंवा लोकांसमोर काय-बाय बरळून जातात. अनेकदा लोकांना माहिती नसलेले नेतेदेखील अशा वक्तव्यांनी लोकांना माहिती पडून जातात. पारीचारकांचा निकाल लागत नाही तोवर नवनिर्वाचित आ. तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राला भिकारी करण्याची भाषा केली. अर्थात हा मुद्दा कमी संवेदनशील असल्याने यावर जास्त चर्चा आज झाली नाही. प्रसिद्धीला हाताशी काही नसले की, काहीबाही बरळून प्रसिद्धीला येण्याचा हा निश्चितच नवा फॉर्म्युला नाही. मात्र आता पारिचारकांच्या निलंबनाने अशा लोकांच्या जिभेला काहीअंशी ब्रेक लागणार आहे. हे लोकं असं बरळून गेल्यानंतर देखील जनमताचा आधार कसं काय घेतात? हा प्रश्न मात्र चिंतनीय आहे.