जिममध्ये नशेखोर तरुणाचा हैदोस

0

कल्याण : कल्याण पूर्वेकडील कचोरे गाव परिसरातील श्रीकृष्ण नगरमध्ये असलेल्या युवर्स जिममध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा इरफान उर्फ इप्पा इसतीयज पठान हा तरुण हातात सुरा घेवून आला. इरफानने कोणती तरी नशा केली होती या नशेच्या धुंदीत त्याने व्यायाम करणार्‍या तरुणांना मारहाण केली.तसेच जिमचालक मोहम्मद सलमान अन्वर खान याला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्या मानेवर सुरा ठेवत त्याच्या ड्रॉवरमधून रोकड घेऊन पसार झाला. या प्रकरणी मोहम्मद याने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारींनुसार पोलिसांनी इरफानविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.