मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बु.॥ येथील जियो कंपनीच्या टॉवरच्या जनरेटर मधून रात्री डिझेलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जनरेटरमधून पाच हजार सहाशे रुपये किंमतीचे सुमारे 60 लिटर डिझेल चोरी झाल्याचे सांगण्यात आले. टॉवरवरील टेक्नीशीयन राहुल बाळू राऊत यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला डिझेल चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हरीश गवळी तपास करीत आहे.