जिलेटीनचा स्फोट घडवत चारठाण्यात युवकाची हत्या

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील चारठाणा येथे अंगणात झोपलेल्या आकाश राजू वरखेडे (22) या युवकाच्या खाटेखाली जिलेटीनचा स्फोट घडवून त्याची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना 6 जून रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आकाश हा आपल्या अंगणात खाटेवर झोपलेला असताना अज्ञात आरोपीने जिलेटीनची कांडी त्याच्या खाटेखाली लावून स्पार्किंग करत स्पोट घडवला. या घटनेत आकाश जागीच ठार झाला. या स्फोटमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली तर पहाटे ग्रामथसंनी घटनास्थळी धाव घेतली. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. यात एका व्यक्तीच्या घरात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. गावात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून घटनास्थळी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मयत आकाश वरखेडे याचा मृतदेह मुक्ताईनगर जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.