जिल्हयातील 8.57 लाख मुलांना रुबेला लस दिली जाणार

0

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांची माहिती

जळगाव – राज्य शासनाने 9 महिने ते 15 वर्षे वयाच्या मुलांसाठी गोवर आणि रुबेला आजारावर लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. ही मोहिम 27 नोव्हेंबर पासून जिल्हयात राबविण्यात येईल. या मोहिमे दरम्यान जिल्हयातील 8 लाख 57 हजार 848 मुलांना गोवर रुबेला लस दिली जाईल असून एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी आज दिली.

यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोवर रुबेला लसीकरण मोहिमेची आढावा बैठक ओयाजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. कमलापूरकर, युनिसेफचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रकाश नंदापूरकर यावेळी उपस्थित होते.

सौम्य संक्रामत आजारावर होणार मात- सीईओ दिवेकर
लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्‍या गोवर आजार हा अत्यंत संक्रामण आणि घातक आजार आहे. 2016 च्या आकडेवारी नुसार गोवर आजारामुळे जवळपास 49 हजार 200 मुले संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी मृत्यू पावतात. रुबेला हा त्या मानाने सौम्य संक्रामत आजार आहे. जो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो. जर गर्भवती स्त्रियांना रुबेला या आजाराचा संसर्ग झाला तर यामुळे अचानक गर्भपात किंवा जन्मजातदोष (जसेकी, अंधत्व, बहिरेपणा आणि हदय विकृती) होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यामधील नियमित लसीकरण कार्यक्रमाध्ये समाविष्ठ – अपर जिल्हाधिकारी गाडीलकर
अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर म्हणाले की, भारत सरकारने सन 2020, सालपर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शासनाने टप्प्या टप्याने गोवर रुबेला ही लस विविध राज्यामधील नियमित लसीकरण कार्यक्रमाध्ये समाविष्ठ करीत आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये राज्यात गोवर लसीकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आल आहे. आपल्या जळगाव जिल्हयामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील अंदाजित 12 लाख 25 हजार लाभार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी काही लाभार्थ्यांना जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्यांना हा अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व चार आठवड्यात होणार कामे – डॉ. कमलापूरकर
मोहिमेसाठी निधीरित करण्यात आलेल्या वयोगटातील लाभार्थी 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील असून एकूण लाभार्थ्यांपैकी 60 ते 65 टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 27 नोव्हेंबर 2018 रोजी होणार आहे. मोहिम सुरु झाल्यानंतर किमान 4 ते 5 आठवडयांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हयातील 3 हजार 380 शाळांमध्ये एकूण लसीकरण सत्र 4366 पहिल्या 2 आठवडयात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतील त्यानंतर उर्वरित 35-40 टक्के लाभार्थ्याचे गोवर रुबेला लसीकरण 3639 नंतरच्या 2 आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्र एकूण 3033 दुर्गम अति जोखमीचा भाग मधील एकूण सत्र 135 व संस्थेतील एकूण सत्र 2483 मध्ये असे एकूण जिल्हयातील 10 हजार 17 सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोवर रुबेला मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी आपल्या 9 महिने ते 15 वर्षे पर्यतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेला लसीकरणा करुन दयावा ही लस पूर्णत: मोफत असणार असल्याचेही डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले. या बैठकीत आरोग्य विभाग, शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.