जळगाव । जिल्हा पोलीस दलातील 18 पोलिस निरीक्षकांच्या मंगळवारी जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बदल्या केल्या आहेत. यांच्या झाल्या बदल्या (कंसात बदलीचे ठिकाण) :पोलिसनिरीक्षक एकनाथ पडोेळे, जिल्हापेठ (पारोळा); अशोक रत्नपारखी, आर्थिक गुन्हे शाखा (तालुका ठाणे), धनंजय येरुळे, औरंगाबाद (शहर ठाणे), बापू रोहम, ठाणे शहर (रामानंदनगर पोलिस ठाणे), प्रदीप ठाकूर, शहर पोलिस ठाणे (वाहतूक शाखा), प्रवीण वाडिले, रामानंदनगर पोलिस ठाणे (शनिपेठ ठाणे), सुनील गायकवाड, चाळीसगाव ग्रामीण (जिल्हापेठ ठाणे). याप्रमाणे बदल्या झाल्या आहेत.