जळगाव । शिवतीर्थ मैदानावरुन पायी जाणार्या शिरसोलीतील एका तरुणाचा रस्ता आडवून त्यास दोन जणांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील एक हजार 30 रुपये देखील लांबविले.
शिरसोली येथील गजानन पंढरीनाथ खंते (वय 29) हा तरुण जळगावात तहसील कार्यालयात कामानिमित्त आला होता. तो तहसील कार्यालयातील काम आटोपून 11 जून रोजी सकाळी 11 वाजता नवीन बसस्थानकाकडे शिवतीर्थ मैदानावरुन पायी जात होता. त्याला रस्ता अमर सीताराम बारुट (वय 30, रा. शिवाजीनगर), हर्षवर्धन सुदाम पवार (वय 20, रा. गेंदालाल मिल परिसर) यांनी आडवला. काहीही कारण नसताना गजाननला मारहाण करण्यात आली. त्यांच्या खिशातील एक हजार 30 रुपये लांबविण्यात आले. याबाबत दोघे तरुणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.