जिल्हाधिकारीपदी किशोर राजे निंबाळकर रूजू

0

जळगाव । जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मावळत्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल याच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की आवास योजना, पेयजल योजना, पेसा, संगणीकृत सातबारे, यापेक्षाही हगणदारीमुक्तीला सर्वात जास्त प्राधान्य देणार असल्याचे पत्रकार परीषदेत दिली.

किशोर राजेनिंबाळकर यांनी पदभार स्विकारल्यानंतर आवास योजनेचे टारगेट मोठे आहे.नवीन व जुने घरे मार्चपर्यंत पुर्ण करणार .याचबरोबर मुख्यमंत्री पेयजल योजना मंजुर योजना तातडीने पुर्ण करणार,ग्राम सडक योजना वेळीच पुर्ण करणार, आपले सरकार पोट्रलवर असणार्‍य तक्रारी प्राधान्याने सोडविणार तसेच सर्व टिमला घेवून हगणदारीमुक्त जिल्हा करणार. 7/12 संगणीकृत जिल्हा म्हणून सर्वात शेवटचा जिल्हा आहे.त्यामुळे त्यावरभर सर्वाधिक भर देणार आहे.वाळू लिलावाचा प्रश्‍न सुटेलेला नाही. 60 टक्के लिलाव झाले आहे.मात्र डिपॉझिट रक्कम भरलेली नाही.जिल्ह्यातील सर्व शाळांची गुणवत्ता सुधारायची आहे. डिजिटल शाळा मोठ्या प्रमाणावर करायच्य आहे.यासाठी पैश्यांची तरतूद ,पेसा अतर्गत किवा विविध कंपनाच्या सहकार्‍याने आपण हे करणार असल्याचे ते म्हणाले. पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मुख्य आहे.सध्याला तीन टँकर सुरू आहे. स्वच्छतेला सर्व प्रथम प्राधान्य असणार असून जिल्हा हगणदारीत सर्वात मागे आहे. शौचालयत बांधणार तसेच मार्च 2018 पर्यंत हगणदारीमुक्त जिल्हा करण्याचे टारगेट राहिल.