जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भडगाव नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प येथील सुका कचऱ्याचे विविध प्रकारात केलेले वर्गीकरण व ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या कंपोस्ट खताची पाहणी करून भडगाव नगरपरिषदेचे कौतुक केले. 

भडगाव (प्रतिनिधी)

आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भडगाव नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्प येथील सुका कचऱ्याचे विविध प्रकारात केलेले वर्गीकरण व ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या कंपोस्ट खताची पाहणी करून भडगाव नगरपरिषदेचे कौतुक केले.

तसेच ऑक्सिजन पार्क येथे लावण्यात आलेल्या आमराई, फणसबाग, फळबागांची व मिया वाकी पद्धतीने वृक्षलागवडची पाहणी केली. घनदाट पद्धतीने लावण्यात आलेल्या मियावाकी प्रकल्पाची पाहणी करून जिल्हाधिकारी साहेबांनी छोटेखानी जंगलात आल्याचा भास होतो असे सांगून हा प्रकल्प नक्कीच जिल्ह्याला आदर्श ठरेल असे म्हणत भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी याचे हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. जिल्हाधिकारी हे भडगाव येथे पंचायत समिती अंतर्गत महिला बालकल्याण विभागाच्या कार्यक्रमाला आले होते. अचानक त्यांनी या प्रकल्पांना भेट दिली. याप्रसंगी भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, तहसीलदार मुकेश हिवाळे, तसेच भडगाव नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.