जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई

0

जळगाव। जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या आदेशानूसार कार्यालयाच्या आवारात बेशिस्त वाहन लावणार्‍यांवर कडक कारवाईची तंबी दिल्यानंतर आज कार्यालयात तब्बल 22 जणांवर कारवाई करत 4 हजार 400 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. मार्च अखेर असल्यामुळे जिल्हा प्रशासन कार्यालयात मोठी वर्दळ होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार्किंगची सुविधा असल्यावरही येणार्‍या व जाणार्‍या व्यक्ती हवे त्या ठिकाणी वाहन लावून जात असल्यामुळे इतर गाड्यांना जाण्या येण्यासाठी अडचणी निर्माण होत होती.

जिल्हाधिकारी यांनी दिले कारवाईचे आदेश
सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात शहर पोलिस वाहतूकीचे पोलिस कर्मचारी यांनी कारवाईला सुरूवात करण्यात आली होती. याठिकाणी काही जणांची गाडी सोडविण्यासाठी इतर मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कोणी गाडी सोडविण्यासाठी अपशब्द व उद्घटपणे वागत असेल तर सरळ माझ्या कार्यालयात पाठवून द्यावी असे निर्देश खुद जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले असल्यामुळे कुणीच वादविवाद न घालता सरळ 200 रूपयांची मेमो देण्यात आला. यावेळी शहर पोलिस विभागाचे सात ते आठ पोलिस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. या कारवाईत गुलाम दस्तगिर खान, सुनिल पाटील, रविंद्र कोळी, संजय महाजन, अशोक महाजन, सोपान पाटील, योगेश वराडे, विलास पाटील यांनी करवाई करत 22 वाहनधारकांकडून प्रत्येकी 200 रूपये प्रमाणे 4400 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.