जिल्हाधिकारी निंबाळकर, आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली

0

जळगाव । जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली झाली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या जागी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे तर मनपा आयुक्तांच्या जागी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे राज्य अभियान संचालक डॉ.उदय टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या निंबाळकर यांची बदलीच्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. डॉ. ढाकणे हे 1994 च्या बॅच आयएएस अधिकारी असून माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव तर विजनिर्मिती कंपनी यांचे कार्यकारी संचालक, महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाचे जॉईन्ट सेक्रेटरी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तर आता दोन वर्षापासून येथे महानगरपालिकाचे आयुक्त म्हणून पदभार संभाळला आहे. तर महापलिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची आठ महिन्यापूर्वी यांची नियुक्ती झाली होती. दरम्यान, आयुक्त डांगे यांची पदस्थापना करण्यात आलेली नाही.