पिंपरी-चिंचवड शहरातील ‘हार्ट’ अशी ओळख असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मिलिटरी डेअरी फार्म उड्डाणपूला संदर्भात संरक्षण विभागाची रखडलेली मंजूरी शिवसेनेच्या दोन्ही खासदारांच्या प्रयत्नाने सोडविणे तसेच स्मशानभूमी ते सुभाषनगर हा विकास आराखडयातील रस्ता विकसित करावयास घेण्याच्या कामाला प्रारंभ करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. पिंपरी येथील सिंधी बांधवांना निर्वासित क्षेत्र जाहीर केल्यानंतर सनद देण्याबाबत महसुलमंत्र्यांच्या सुचनेनुसार नगरभूमापन अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयांच्यावतीने संयुक्त सर्व्हे करण्याच्या कामास पुढील आठवडयात सुरूवात करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत दूरध्वनीवरून पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही सहभाग घेतला.
यावेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी डाल्को कंपनीच्या जागेवर मल्टीस्टोअरेज पार्कींग उभारण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश आयुक्तांनी शहर अभियंतांना दिले. मिलिंदनगेर येथील तयार दोन इमारतींचे पुनर्वसन, अजंठानगर येथील 20 वर्षापासूनचे भिजत पडलेले पुनर्वसन आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली व हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.