जळगाव । जिल्ह्यात 7/12 संगणकिकृती करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सुचना देऊन सुद्धा काम पूर्ण न झाल्यामुळे आज 30 जून रोजी नियोज भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती़ या बैठकीत 5 जुलैचा अल्टीमेटम देण्यात आला आहे़ जर 5 जुलैपर्यंतही 95 टक्के काम होणार नसेल तर खुर्ची सोडा असा आदेश आज झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचे सांगण्यात आले़ यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, प्रांताधिकारी जलज शर्मा यांच्यासह तहसिलदार, सर्कल, नायब तहसिलदार, तलाठी उपस्थित होते. जिल्ह्यात 1 हजार 502 गावे आहेत़ त्यातील 60 गावांचे 95 टक्के पेक्षा कमी सातबारा संगणकिकृत झाले असल्याचे सांगण्यात आले़ आणि या गावातील 93 टक्के गावांची चावळीवाचन सुद्धा झालेले आहेत़
80 टक्के कामे पूर्ण
जळगाव तालुक्यातील 9 ठिकाणी सातबारा संगणिकृती 80 ते 90 टक्केच झाली आहे़ त्यात जळगाव शहर, मेहरुण, पिंप्राळा उपनगर, कुसुंबा, आव्हाणे, मन्यारखेडा, निमखेडी, सावखेडा, खेडी बु़ आदी गावांचा समावेश आहे़ तर तालुक्यातील फक्त म्हसावद, वाकडी, बोरनार, गोढोदा या चार गावांचे चावळीवाचन बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. काही गावांची क्षेत्र मोठे आहेत, त्यानुसार उतारेसुद्धा मोठे आहेत त्यामुळे ऑनलाईन दाखल करतांना नोंदी फार कराव्या लागतात, तसेच शहरात काही जुनी 200 ते 250 अपार्टमेंट आहेत़
चावडी वाचन शेवटच्या टप्प्यात
ऑनलाईन सातबारा उतारा मिळणार असल्याने संगणकीकृत सातबार्यात काही चुका राहिल्या आहेत का यासाठी प्रत्येक सज्जावर चावडी वाचन करण्यात येत आहे. चावडी वाचनात काही चुका असल्यातर ते लगेचच दुरुस्त करण्यात येत आहे. शेतकरी स्वत: उपस्थित राहून उतार्याची शहानिशा करून घेत असल्याने भविष्यात दाखल्या संबंधी अडचण राहणार नाही. जिल्ह्यातील चावडी वाचन शेवटच्या टप्प्यात असून त्यानंतर संगणकीकरणाचे काम पुर्ण होणार आहे. प्रत्येक सज्जातील दोन-चार गावे चावडी वाचनाचे शिल्लक आहे.
95 टक्के काम हवे होते
जमीनीचे अविभाज्य क्षेत्र घ्यावे लागते़ तसेच 155 साठी तहसिलदारांचे आदेश लागतात त्यामुळे जळगाव शहरातील संगणिकृत सातबाराची कामे बाकी असल्याचे सूत्रांकडून समजते़ संगणकिकृतमध्ये चाळीसगाव, अमळनेर व जळगाव मागे असल्यामुळे 5जुलै पर्यंत काम पूर्ण करा अन्यथा त्या जागेवर दुसर्यांला काम करु द्या, मला ही बैठक घेण्याची आवश्यकता वाटत नव्हते पण घ्यावी लागली कारण आतापर्यंत 95 टक्के काम पूर्ण व्हायला हवे होते़ त्यामुळे रात्रंदिवस काम करुन आपल्या भागातील सातबारे संगणीकृत 5 जुलै पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले़ सर्व संगणककीकृत झाल्यानंतर शेतकर्यांना ऑनलाईन सातबारा उतारा मिळणार आहे.