जिल्हाधिकार्‍यांच्या नोटीसनंतर गोलाणी होणार स्वच्छ

0

जळगाव । जिल्हाधिकार्‍यांना मिळालेल्या तक्रारीवरून प्रातंधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गोलाणी संकुलाच्या स्वच्छतेबाबत पाहणी केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्तांसह अन्य विभागांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासन मनपा मालकीच्या सर्व व्यापारी संकुलाती गाळेधारकांना संकुलाची स्वच्छता तुम्हीच करायची आहे. अशी नोटीस बजावण्याची प्रक्रियेला सुरवात केली आहे.

स्वच्छतेची जबाबदारी मनपाची नसून गाळेधारकांची
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना गोलाणी संकुलातील अस्वच्छतेबाबत शरद काळे यांनी तक्रार केली होती. यावर जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी जलज शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांना संकुलाची पाहणीसाठी पाठविले होते. पाहणी केल्यानंतर प्रांताधिकारी शर्मा यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांच्यासह, प्रदूषण बोर्डाचे उपप्रादेशिक संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी व तालुका दुकान निरीक्षकांना नोटीस दिल्या होत्या. यावरून महापालिकेच्या आरोग्य विभाग गोलाणीची संपूर्ण स्वच्छता करणार आहे. तसेच सांडपाण्याची निचरा होण्याबाबत सफाई केली जाणार आहे. त्यातच मनपाच्या 27 व्यापारी संकुलातील 4 हजार 641 गाळेधारकांना संकुलाची स्वच्छतेची जबाबदारी मनपाची नसून ती गाळेधराकाची आहे. त्यामुळे स्वच्छता तुम्हीच करायची आहे. व उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर कारवाई केली जाईल अशी नोटिसा गाळेधारकांना बजावल्या जात आहे.