जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते बांभोरी परिसरात वृक्षरोपण

0

जळगाव । सर्गिक संपदा जपणे अत्यंत महत्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करायला हवे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना सर्व सजीवांना प्राणवायू मिळावा यासाठी वृक्षारोपण करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. शासनाच्या वृक्ष लागवड उपक्रमाबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. बांभोरी येथील फाउंडेशन ब्रेक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कंपनी परिसरात पर्यावरण संवर्धनाकरिता दरवर्षी वृक्षांची लागवड केली जाते. यंदा 500 वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या अभियानाची सुरूवात मंगळवारी करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमास कंपनीचे प्लांट हेड योगेश फालक, कामगार संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र इंगळे, सचिव नाना खैरे, कामगार, अधिकारी उपस्थित होते. नैडीजीएम डॉ. कैलास पाटील यांनी आभार मानले. बांभोरी येथील फाउंडेशन ब्रेक कंपनीत वृक्षारोपण करताना जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर. समवेत कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी.