जिल्हाधिकार्‍यांतर्फे डॉल्बी मंडळाविरोधात संचारबंदी

0

कोल्हापूर । आवाज मर्यादेचे उल्लंघन होवू नये न्यायालयाने आदेश दिले आहे.असे असूनही गणेश आगमनासाठी अनेक मंडळांनी डॉल्बीचा आग्रह धरला होता.तर काही पक्ष,संघटनानी,परवानगी मिळावी यासाठी मोर्चे, निर्देशने काढली होती.यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून डॉल्बीवाल्या मंडळांविरोधात संचारबंदी लागू आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार जारी केला असून, दि. 4 सकाळी सात वाजल्यापासून ते दि.8 संध्याकाळपर्यंत याची अंमलबजावणी होणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

अतीवापर आरोग्यास घातक
आवाज मर्यादेचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. डॉल्बीचा दणदणाट करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतात. डॉल्बीच्या अतिवापराने आरोग्याचेही प्रश्न उद्भवतात. यापूर्वी डॉल्बीची भिंत कोसळून संदीप टिळे हा तरुण गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉल्बीच्या दणदणाटाने महाद्वार रोड परिसरात एक इमारत कोसळून दुर्घटना घडली होती. याशिवाय डॉल्बीमुळे विसर्जन मिरवणूक रेंगाळते. मंडळांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका असल्याने डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बी मशिन पोलिसांकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. डॉल्बी यंत्रणा घरी ठेवल्यास तिचा वापर न करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचा आदेशही डॉल्बी व्यावसायिकांना दिला आहे. यात टाळाटाळ करणार्‍या व्यावसायिकांची डॉल्बी यंत्रणा त्यांच्या घरात जाऊन जप्त केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. गरज पडल्यास डॉल्बीवाल्या मंडळांना 144 कलम लागू करण्यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही त्यांनी केली.