जळगाव: जिल्ह्यातील बोदवड, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकांनी सरकारी दस्तऐवज (दफ्तर ) बेकायदा ताब्यात ठेवले होते. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे खटला दाखल केला होता. आज सुनावणीच्या अंतीम दिवसापर्यंतही ग्रामसेवकांनी शासकीय दप्तर न दिल्याप्रकरणी त्यांना जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्याची खळबळजनक घटना आज घडली. दरम्यान यात आठ ग्रामसेवकांचा समावेश असुन त्यापैकी पाच ग्रामसेवकांना अटक करण्यात आली असुन इतर दोन जण सुनावणीला गैरहजर राहिल्याने त्यांना दिसतील त्याठिकाणाहून ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.