चाळीसगाव । गांजा तस्कराकडून दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर पुराव्यानिशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे, या आरोपामुळे भाजपची बदनामी झाली आहे. हा आरोप खोटा किंवा खरा हे सिद्ध होईपर्यंत उदय वाघ यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यानी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडेे निवेदनाद्वारे केली आहे.
शेकडो कार्यकर्त्यांचे पत्र
जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्यांची वैयक्तिक व पक्षाची होत असलेली बदनामी थांबवण्यासाठी त्याचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पद सोडण्याची मागणी चाळीसगाव भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे पत्र शेकडो कार्यकर्ते यांच्या सहीने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी फोनवर चर्चा करून भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे फॅक्स ने पाठवण्यात आले.
यांच्या आहेत स्वाक्षर्या
या पत्रावर सही करणार्यांमध्ये प्रामुख्याने भाजपचे दोन्ही माजी आमदार साहेबराव घोडे, माजी आमदार ईश्वरभाई जाधव जेष्ठ नेते व योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे नगरपालिका गटनेता राजेंद्र चौधरी, नगरसेवक सुरेश स्वार, पत्रकार तथा सरपंच टाकळी. प्र.चा.किसनराव जोर्वेकर, राकेश नेवे, बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील, नानाभाऊ पवार, डॉ रमेश निकम, माजी जिप सभापती राजेश राठोड, युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी विवेक चौधरी, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, खडसे प्रतिष्ठानचे अरुण पाटील, भूषण महाजन, जितेंद्र राठोड, मनोहर सूर्यवंशी, सचिन शिंपी, राजेंद्र मांडे, किरण पोतदार, रुपेश पाटील, पंकज राणा, दिलीप गवळी, सुरेंद्र पाटील, चेतन पाटील, सुभाष चौधरी, कैलास मांडोळे, संजय चौधरी, सुभाष येवले, जितेंद्र पाटील उंबरखेडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी स्वाक्षर्या असलेले निवेदन मा. प्रदेश अध्यक्षांनापाठवून राजीनाम्याची विनंती केली.