जिल्हापेठ पोलीस ठाण्यासमोरील मेडीकल फोडले

0

वर्धमान ड्रग्ज हाऊस मधून सव्वा लाखाची रोकड लांबविली

जळगाव : – शहरातील नाहाटा हॉस्पीटल शेजारील वर्धमान ड्रग्ज हाऊस हे दुकान फोडून चोरट्यांनी ड्रॉवर मधील 1 लाख 33 हजार लांबविल्याची घटना मंगळवारी घटना सकाळी साडेसात वाजता समोर आली आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. जर पोलीस ठाण्याजवळील तसेच वर्दळीच्या रस्त्यावरील दुकानात चोरी होत असेल तर पोलीस कर्मचारी रात्रीची गस्त घालतात काय आणि घालत असतील तर कशी घालतात हा प्रश्‍न समोर आला आहे.

नाहाटा हॉस्पील मध्ये सकाळीच एका रुग्णाची शस्त्रक्रिया असल्याने तातडीने मेडीकल साहित्य हवे असल्याने कंपाऊंडर विजय फालक याने वर्धमान ड्रग्ज हाऊस या मेडीकल दुकानाचे मालक दिनेश राका यांना फोन करुन सकाळी लवकर बोलावून घेतले. सकाळी साडेसात वाजेच्या सुमाराच चावी घेवून राका दुकानावर पोचल्यावर त्यांनी चावी लावण्यापुर्वीच लॉक उघडे झाले, निरखुन पाहिल्यावर शटर वाकवलेले आढळून आले, शटर उघडल्यावर आत पाहताच ड्रॉवर मधील 1 लाख 33 हजारांची रोकड लंपास झाल्याचे आढळले. तत्काळ घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पहाणी केली. परिसरातील सिसीटीव्ही फुटेज संकलीत करण्यात येत असून राका यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहे.