जिल्हाबंदी असल्याने मालाचे नुकसान

0

वाहनांना परवानगी देण्यात यावी

तळोदा। तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी यांचा माल शेतात पिकत असून त्याला खरेदी करणारे परराज्यातील व्यापारी हे जिल्हाबंदी असल्याने ते खरेदी करण्यासाठी येत नसल्याने मालाचे नुकसान होत आहे.त्यामुळे माल घेउन जाणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी यांनी तहसीलदार पंकज लोखंडे यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी करण्यात आली आहे.त्यामुळे परराज्यतील व्यापारी हे ह्या भागात माल खरेदीसाठी येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. समजा शेतकऱ्यांचा माल व्यापारी घेऊन न गेल्यास नुकसान होणार आहे. शेतकरी कर्जबाजारी होईल, असे निवेदनात सांगण्यात आले आहे

निवेदनावर दिगंबर आत्माराम माळी, संदीप मगरे, राजकपुर मगरे, भरत माळी, संदीप सूर्यवंशी, नितिन बाविस्कर आदिसह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत