जळगाव। शेतकर्यांना शेतीला पुरक व्यवसाय मिळावा यासाठी जिल्ह्यात 1991 साली दुध संघाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान दुध उत्पादक संघाला 46 वर्षे पुर्ण झाली असून यंदा दुध उत्पादक संघाची 400 कोटी इतकी विक्रमी उलाढाल झाल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हा दुध उत्पादक संघाच्या बैठकीत केले. जिल्हा दुध उत्पादक संघाची 47 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संघाच्या चेअरमन मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार एकनाथराव खडसे, राजूमामा भोळे, किशोर पाटील, खासदार ए. टी. पाटील, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड.रोहीणी खडसे- खेवलकर यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
32 कोटीची ठेव
ज्यावेळी दुध उत्पादक संस्थेच्या चेअरमनपदी मंदाताई खडसे रुजु झाल्या त्यावेळी संस्थेची 19 कोटी ठेव होती. आज संस्थेची 32 कोटी ठेव असून ही रक्कम जिल्हा बँकेत ठेवण्यात आली असल्याचे आमदार खडसेंनी सांगितले. तसेच ठेवीच्या व्याजापोटी मिळणार्या निधीचा वापर दुध उत्पादकांच्या प्रशिक्षणावर तसेच संस्थेसाठी खर्च करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
कोटी 96 लाखाचा नफा
दुध संघातील संचालक मंडळाने दोन वर्षात चांगले उत्पन्न मिळवून दिले आहे. संघाला 2 कोटी 96 लाख रुपयाचा ढोबळ नफा झाला आहे. मात्र येत्या काही वर्षात संचालक मंडळानी पुढील 10 वर्षाचा कार्यक्रम आखून संघाची उलाढाल अजून 200 कोटी पर्यंत वाढविण्यासाठी नियोजन करणे गरजचे असल्याचे आमदार खडसेंनी सांगितले.
त्यानंतर जास्ती दुध उत्पादन करणार्यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यास पशुधनावर उपचार करणे सोपे जाईल त्यामुळे दुध उत्पादक संघाच्या उत्पन्न वाढीस मदत होईल असे यावेळी सांगण्यात आले.
दुधाच्या वितरणात वाढ
जिल्हा दुध उत्पादक संघात अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यंदा जिल्ह्यातील दुध विक्रीमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच दुध संघातील कर्मचार्यांच्या पगारात देखील 22 टक्केवाढ करण्यात आली असून कर्मचार्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रत्येकी 2 लाख रुपयांचा मेडीक्लेम संघातर्फे करण्यात आला असल्याचे दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांनी सांगीतले. राज्यात केवळ तीन ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. गेल्या सव्वा वर्षापासून मंजूर झालेले हे महाविद्यलयाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दोन वर्षात काटकसर करुन दुध उत्पादकांचा विश्वास संपादन केल्याचे आमदार खडसेंनी सांगितले. एनडीडीबीमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महानंदाच्या चेअरमन यांना सदस्यपद मिळाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.