जिल्हाभरात खरिपाचे 78 टक्के पेरण्या

0

जळगाव । गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारल्याने यावर्षीच्या पीक उत्पादनात कमालीची घट होत असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी माहिती दिली. येत्या तीन दिवसात पावसाचे अनुकुल वातावरण असल्याने दुबार पेरणीचे संकट टळणार असून शेतकर्‍यांनी पीक मोड करु नये असे आवाहनही यावेळी केले. यंदा जिल्ह्यात एकूण 78 टक्के खरिपाची पेरणी झाली असून त्यात जळगाव 103, भुसावळ 76, बोदवड 85, यावल 74, रावेर 42, मुक्ताईनगर 58, अमळनेर 84, चोपडा 51 एरंडोल 106, धरणगाव 78, पारोळा 76, चाळीसगाव 69, जामनेर 95, पाचोरा 91 व भडगाव 96 टक्के प्रमाणे पेरण्या झालेल्या आहेत. उशिरा पेरणी करत असतांना शेतकर्‍यांनी सोयाबिन, बाजरी व मका हे पीक घेवून उत्पादन चांगले काढता येणार असून यांची पेरणी करावी असे आवाहन केले आहे.