जिल्हास्तरावरुन 12 प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड

0

जळगाव । तालुक्यातील कुसूंबा खुर्द येथे राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण विभाग जि.प.जळगाव, श्री स्वामी समर्थ प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयूक्त विद्यमाने 2017-18 या शैक्षणिक वर्षातील 73 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तालुकास्तरावरुन निवड झालेल्या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. जिल्हास्तरावरुन 12 प्रकल्प (उपकरणांचे) राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. प्राथमिक विद्यार्थी गटातून दोन, आदिवासी प्राथमिक गटातून एक, माध्यमिक विद्यार्थी गटातून तीन, आदिवासी माध्यमिक गटातून एक, प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्यातून एक, माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्यातून एक, प्राथमिक लोकसंख्या शिक्षकातून एक, माध्यमिक लोकसंख्या शिक्षकातून एक, प्रयोग शाळा परिचर गटातून एक असे 12 प्रकल्पाची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे.

155 उपकरणे सादर
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 155 शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपकरणे सादर केली. यात विद्यार्थ्यांनी नवनवीन विषयांना हात घातला. प्राणी वाचवा, आधुनिक शेती, पाण्याचे महत्त्व, अशुद्ध पाणी शुद्ध करणे, रेल्वे रुळाची स्वच्छता आदी विषयावर प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आले. प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे, माध्यमिक शिक्षाधिकारी देविदास महाजन, प्रा.राजेंद्र महाजन, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, डी.एम.देवांग, मनोज पाटील, विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, बी.डी.धाडी, आर.एल.माळी, सी.डी.पाटील, अनिल चव्हाण, प्रतिक्षा पाटील, हेमंत सोनार आदींची यावेळी उपस्थित होते.

प्राथमिक विद्यार्थी गट प्रथम- सोहम बहाळे (सिम्पल मायक्रोफोन) के.नारखेडे विद्यालय भुसावळ, द्वितीय-पियुष पाटील (आधुनिक रोप लावणी यंत्र) केशव माध्यमिक विद्यालय पारोळा,

आदिवासी प्राथमिक गट प्रथम-अरबाज तडवी (परिदर्शी) जे.एस.जावळे विद्यालय कुसूंबे ता.रावेर,

माध्यमिक गट प्रथम-रितेश पाटील (ऑटो बी.एस.एस.) घाटे विद्यालय उचंदे ता.मुक्ताईनगर, द्वितीय-योगेश्‍वरी जावळे (वेस्ट कलेक्टर) बियाणी मिल्ट्री स्कुल भुसावळ, तृतीय-अमेय जोगी (फ्लोर क्लिनर) सेंट अलॉयसेंस भुसावळ

आदीवासी माध्यमिक गट प्रथम-गणेश बारेला (चारकेतू, बायोसेंड वॉटर फिल्टर) आश्रमशाळा कर्जाणे ता.चोपडा,

प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य प्रथम-योगिता ममराज पवार (जि.प.शाळा जळके)

माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य प्रथम-रियाज ऐहतम जाफर शहा (इकरा उर्दु हायस्कूल जळगाव)

प्राथमिक लोकसंख्या शिक्षक प्रथम-शालिग्राम निकम (जि.प.शाळा, वळवी पिलखोडा ता.चाळीसगाव)

माध्यमिक लोकसंख्या शिक्षक प्रथम-विनोद बाबुलाल सपकाळे (प्राथमिक विद्या मंदीर आडगाव ता.एरंडोल)

प्रयोग शाळा परिचर प्रथम-धनराज महाजन (स.जी.जी.हास्कूल रावेर)