जिल्हास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धेत एस.बी. पाटील कॉलेजला सुवर्णपदक

0

पिंपरी : रावेत येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचे विद्यार्थी सोमदत्त काळभोर व वीरेंद्र पाटील यांनी 22 वर्षाखालील मुलांच्या गटात पाचव्या जिल्हास्तरीय ऑलम्पिक स्पर्धेत अनुक्रमे बुद्धीबळ व ज्यूदोमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्‍वस्त भाईजान काझी, तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट गिरीष देसाई, प्राचार्य अनुजा कामठे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना कॉलेजचे क्रीडा शिक्षक प्रदीप कासार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.