जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत डोणगावचा संघ विजयी

0

यावल- तालुक्यातील डोणगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलमध्ये यावल तालुका शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धा अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत डोणगावच्या संघाने सरस्वती विद्या मंदिराच्या संघाचा पराभव केला. 14 व 17 वयोगटात स्पर्धा झाली. अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल डोणगाव शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डांभुर्णी केंद्राचे केंद्रप्रमुख सोनवणे होते. प्रास्ताविक हर्षल मोरे तर आभार मिलिंद भालेराव यांनी मानले. शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील व केंद्रप्रमुख सोनवणे यांनी उपस्थितांसमोर टॉस करून क्रिकेटच्या सामन्याला सुरुवात झाली. डोणगावच्या इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत 14 व 17 वयोगटातील आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या यावलच्या सरस्वती विद्या मंदिर संघाचा पराभव केला. डोणगावचा संघ आता जिल्हास्तरावर खेळणार आहे. विजय संघाला क्रीडाशिक्षक दिलीप संगेले यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल डोणगावचे संस्थाध्यक्ष विजयकुमार पाटील, संस्थेचे सचिव मनीष पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.