तळेगाव : जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे द्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय नेट बॉल स्पर्धेत तळेगाव येथील आदर्श विद्यामंदिर शाळेने जिल्हास्तरावर दोन्हीही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुले व मुलीच्या 14 व 17 वर्ष वयोगटातील या स्पर्धेचे आयोजन बारामती येथील टी.सी. महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले होते. मुले व मुली जिल्हस्तरीय नेटबॉल स्पर्धेत सलग 3 वर्षे प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धा बारामती येथे होणार आहे. या खेळाचे प्र शिक्षण व मार्गदर्शन सुनिल मंडलिक यांनी केले. मुलीच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून अर्चना आपटीकर व रामाणे यांनी काम पाहिले. खेळाचे पंच म्हणून पुणे जिल्हा नेटबॉल असोशियशनचे समीर सिकीलकर अश्वजित सोनवणे शुभम कोडग रोहीत जाधव यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन क्रीडा शिक्षक अशोक देवकर यांनी केले.