भुसावळ। 31वी ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धा चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आली. यात राज्यभरातील मुष्टिरक्षकांनी सहभाग घेतला.
जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या खेळाडूंनी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली यात अर्जुन गुप्ता, सागर आढाळे, अजगर खान, विशाल राजभर या खेळाडूंनी पदक पटकावले.त्यांच्या यशाबद्दल नगरसेविका साधना भालेराव, रविंद्र भालेराव, सिध्दार्थ सोनवणे, दिलीप तळेकर, मुन्सफ अली, विजय सोनवणे, मिलींद साळुंके यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.