जिल्हास्तरीय मृदा आरोग्य कार्यशाळेचे उद्घाटन

0

शहादा। श शहरातील लोकमान्य टाउन सभागृहामध्ये जिल्हास्तरीय मृदु आरोग्य कार्यशाळेचे उद्दघाट्न करण्यात आले.उन्नतशेती समृध्द शेतकरी पंधरवाडा अंतर्गत दि .13 रोजी मृदु आरोग्य कार्यशाळेचे उदघाट्न करण्यात आले त्यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले की ही कार्यशाळा केवळ अभियानापुर्ती मर्यादीत न राहू देता त्याचा सतत पाठपुरावा केला पाहिजे. जलयुक्तशिवारा विषयी ते म्हणाले, मागेल त्याला शेत तळे द्या. नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर धडगाव अक्कलकुवा येथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. तर शहादा तळोदा व नंदुरबार या तालुक्याना आता मंजुरी देण्यास सुरुवात झाली आहे त्यात शहादा येथे 15 शेततळी झाली आहेत.

100 गावांना शेततळे करण्याचा निर्धार
सध्या जिल्ह्यातील 69 गावाना शेततळांची कामे सुरु आहेत ती 100 पर्यंत करण्याचा निरधार त्यानी ह्यावेळी बोलुन दाखवला. जास्तीत जास्त शेतकर्याना याकरिता जागरुक करा त्यामुळे जोडव्यवसाय जसे मस्त्य उद्योग फळ बागा वैगरे करुन शेतकरी त्याचे उत्पादन वाढवुन शेतकरी सुजलाम सुफलाम होइल त्याला जास्त महत्व देण्याचे आव्हान त्यानी केले.

शेततळी तयार करणार्‍यांचे स्वागत
11 पुनर्वसीत गाववाल्यांची विचारणा कलशेट्टी यांनी केली यात दोन पुनर्वसीय गावात 4ते 5 शेततळी झालीत त्यांचे त्यानी अभिनंदन देखील केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल तात्यानी त्यांच्या शेतात पाच शेततळे असल्याचे सांगुन बांधावर 35 हजार फळ्झाडे लावली असल्याचे सांगितले. यावेळी जि.प. सदस्य अभिजीत पाटील, विद्यापिठाचे शास्त्रज्ञ मुरलीधर महाजन, उपविभागिय अधिकारी शशिकांत सातारकर , शहाद्याचे तहसीलदार मनोज खैरनार आदि मान्यवर उपस्थित होते.