जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेंचे उद्घाटन

0

नंदुरबार । क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यावतीने व नंदुरबार जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धां जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक मनिलालभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार तालुका क्रीडा संयोजन मिनल वळवी, प्रा.राजेंद्र साळुंखे, चंद्रकांत परदेशी, धनराज मराठे, सॅबस्टीन जयकर, क्रीडा संघटक प्रा.मयुर ठाकरे, शांताराम मंडाले, सुरेश गोसावी, राजन गायकवाड, महेंद्र काटे, राजेश कोकणी, जगदिश वंजारी आदींची उपस्थित होती.

नाशिक येथे होणार स्पर्धा
स्पर्धेत धडगांव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा, नवापूर व नंदुरबार अशा सहाही तालुक्यातील 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून प्रथम दोन क्रमांकाचे खेळाडू 9 ते 10 ऑक्टोबर 2017 दरम्यान नाशिक येथे होणार्‍या विभागीय मैदानी स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेत 17 वर्षाआतील मुलांमध्ये 100 मीटर धावणे सलमान खाटीक (नंदुरबार) प्रथम, दीपक मोरे (शहादा) द्वितीय, तर 200 मीटर धावणे सिद्धीक खाटीक (नवापूर) प्रथम, रामदास तडवी (धडगाव) द्वितीयस्थानावर आलेत. लांब उडी स्पर्धेंत दिनेश पावरा (तळोदा) प्रथम, दीपक मोरे (शहादा) द्वितीय, उंच उडी नसिबराज ठाकरे (नंदुरबार) प्रथम, निर्मल पावरा (शहादा) द्वितीय आलेत. थाळीफेक स्पर्धेंत प्रियांशु सोनकुसरे (नंदुरबार) प्रथम, कृष्णा गावीत (नवापूर) द्वितीयस्थान पटकावले.

विविध स्पर्धेतील विजयी खेळाडू
17 वर्षाआतील मुलींच्या गटात 100 मीटर धावणे तेजल वळवी (नवापूर) प्रथम, पूर्वी पाटील (शहादा) द्वितीय तर 200 मीटर धावणे यात नेहा चौधरी (नंदुरबार) प्रथम, निशा पावरा (तळोदा) द्वितीय आली. 19 वर्षाआतील मुले 100 मीटर धावणे अभिजीत ईशी (शहादा) प्रथम, गौरव वळवी (नंदुरबार) द्वितीय तर 200 मीटर धावणे तुषार सुर्यवंशी (नंदुरबार) प्रथम, आकाश कोकणी (नवापूर) द्वितीय तसेच 400 मीटर धावणे तुषार सुर्यवंशी (नंदुरबार), जितेंद्र वळवी (शहादा) द्वितीय आला आहे. लांब उडीत अभय गुरव (नंदुरबार) प्रथम, शांताराम वळवी (नंदुरबार) द्वितीय तर थाळी फेकस्पर्धेंत अजय शिंदे (शहादा) प्रथम, अविनाश वसईकर (नंदुरबार) द्वितीय आला. तसेच गोळाफेक सुनिल पावरा (शहादा) प्रथम, अजय शिंदे (शहादा) द्वितीय आदींसह सर्व गटात मुला-मुलींनी नैपुण्य मिळविले आहे.