नंदुरबार । नंदुरबार डिस्ट्रीक कल्चरल केडमी नंदुरबारतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत शहादा येथील पायल सोनवणे ही तृतीय आली. नंदुरबार डीस्ट्रीक् कल्चरल केडमी नंदुरबार तर्फे राजेश रघुवंशी यांचा वाढदिवसानिमित्ताने खुली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार येथील जीटीपी कॉलेज येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एकूण 30 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा विषय नोटा बंदी, मराठा आरक्षण, स्वच्छता अभियान व आधार कार्ड असे चार विषय देण्यात आले होते त्यापैकी पायल हीने स्वच्छता अभियान या विषयावर आपले मत मांडले व संपूर्ण सभागृह व उपस्थितांचे मन जिंकुन घेतले पायल सोनवणे हीचा तिसरा क्रमांक आला तीला मान्यवरांचा हस्ते स्मृतीचिन्ह 300 रु. रोख देवुन गौरविण्यात आले. कु पायल ही शहादा वसंतराव नाइक ज्यु. कॉलेज येथील प्रा. गणेश सोनवणे यांची मुलगी आहे.