जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलच्या नम्रता मोरेचा द्वितीय क्रमांक

0

जुन्नर । पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे स्व. माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त 3 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले. इंदिरा गांधी एक व्यक्तीमत्व या विषयावर ही वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. वत्कृत्व स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील न्यु इंग्लिश स्कुलची नम्रता शशिकांत मोरे हिने द्वितीय क्रमांक व सानिया सय्यद हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, जिल्हा काँग्रसचे सल्लागार तथा विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी नम्रता मोरे, सानिया सय्यद व इतर सर्व स्पर्धकांचे विशेष अभिनंदन केले. नम्रता मोरे हिला मुख्याध्यापक डी. डी. फापाळे, शिक्षक व्ही. एम. डुंबरे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा
स्व. इंदिराजी गांधी यांच्या विचारांचे अवलोकन व्हावे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते अशी माहिती चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी दिली. इंदिराजी गांधी जन्मशताब्दी महोत्सव समारोप कार्यक्रम व वत्कृत्व स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ 17 नोव्हेंबर रोजी गणेश कला क्रिडा मंच, पुणे येथे पार पडला. ह्यवेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटे, रमेश बागवे, महिलाध्यक्ष चारुलता टोकस, युवक अध्यक्ष विश्‍वजीत कदम, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी आमदार उल्हास पवार, आमदार संग्राम थोपटे, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, जिल्हा निरीक्षक आमदार रामहरी रूपनवर, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, शहराध्यक्ष सचिन साठे, जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

एकूण 33 विद्यार्थी पात्र
8 नोव्हेंबर रोजी जुन्नर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत 35 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम सानिया सय्यद, द्वितीय वेदांत चिखले, तृतीय नम्रता मोरे, उत्तेजनार्थ आकांक्षा औटी व आदिती पठारे या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह व रोख स्वरुपात बक्षिस देऊन गौरविण्यात आले होते. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेसाठी पात्र झाले होते तसेच जिल्ह्यात सर्व तालुक्यात आयोजित केलेल्या वत्कृत्व स्पर्धेतून पुणे येथे 16 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी एकूण 33 विद्यार्थी पात्र झाले होते.