जळगाव । जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत उत्साहात प्रारंभ झाली. प्रारंभी मुलांच्या स्पर्धेत म.न.पा. व उर्वरित अशा गटात एकूण 35 खेळांडूनी सहभाग नोंदवला. स्पर्धा जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनच्या सहकार्याने पायोनियर स्पोर्टस्च्या क्रींडागणावरील रायफल रेंजवर पार पडत आहेत.
यांचा होता सहभाग
यात 14, 17 आणि 19 या गटात मुले व मुली अशा स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षक प्रविण पाटील यांच्या हस्ते रायफलने निशाना साधून पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिराचे पळासखेडा येथील शिक्षक विकार सिद्यीकी होते. प्रमुख पाहूणे म.न.पा.क्रीडा विभाग समन्वयक एम. एम. पाटील, जिल्हा रायफल असो.चे सचिव व मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, भगिरथ शाळेचे चौधरी, आर. आर. इंग्लिश स्कूलचे देवानंद पाटील, सुनिल पाटील व अहमद यांची उपस्थिती लाभली. सूत्र संचालन श्रीराम माध्यमिक किरण पाटील यांनी केले तर आभार संस्थेचे राष्ट्रीय खेळाडू दिक्षांत जाधव यांनी केले. स्पर्धेचे पंचा म्हणून राष्ट्रीय खेळाडू निलेश जगताप, दिपक कोळी, आशिष तिवारी, सागर सोनवणे, सौरभ गवळी, हेमंत मांडोळे व प्रशांत फुलपगारे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्तीतेसाठी संस्थेच्या सर्व खेळाडूंनी सहकार्य केले.