जिल्हास्तरीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धेत किनगावच्या इंग्लिश मिडीयम स्कुलच्या आदिवासी विद्यार्थीनींचे यश

यावल ( प्रतिनीधी ) जिल्हास्तरीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धा शुक्रवार दि.२२ रोजी रायसोनी स्कूल जळगावमध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेत किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या १४,१७ व १९ वयोगटातील विद्यार्थीनींनी उत्कृष्ठ प्रदर्शन करत विजय संपादन केले व विभागीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले विशेष म्हणजे या स्पर्धत आदिवासी विद्यार्थीनी आयोजकांचे लक्ष वेधणारी कामगिरी केली. जळगाव येथे पार पडलेल्या या स्पर्थ त १४ वर्षाआतील वयोगटात दिव्या मेलासिंग बारेला(तृतीय) व अश्विनी शशिकांत बारेला (चतुर्थ) १७ वर्षा आतील वयोगटात पल्लवी सुरसिंग बारेला (प्रथम) स्नेहल पिंटू पावरा (तृतीय) तर रंगीता राहुल बारेला (चतुर्थ)१९ वर्षाआतील वयोगटात मनिषा प्रेमसिंग बारेला (द्वितीय) व

एंजल तानसिंग बारेला (चतुर्थ) यांनी यश संपादन केले या खेळाडूंना पुजा शिराेडे, प्रशिक्षक नरेंद्र भाेई व इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे क्रिडा शिक्षक व यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी सर्व खेळाडुंचे इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व्हा.चेअरमन सौ. शैलेजाताई विजयकुमार पाटील सचिव मनिष विजकुमार पाटील व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील विभागीय स्पर्धेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.