अमळनेर । फक्त पुस्तक वाचून माणसे शहाणे होत नाहीत. यासाठी सभोवतालची माणसे वाचली पाहिजेत, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.आशुतोष पाटील यांनी केले. ते मराठी वाड्ःमय मंडळातर्फे आयोजित दोनदिवसीय जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अन्नपूर्णा मंगल कार्यालयातील बहिणाबाई चौधरी सभामंडपात बोलत होते. व्यासपीठावर मराठी साहित्य परिषदेचे पुणे येथील कार्यवाह वि.दा. पिंगळे, स्वागताध्यक्ष उज्ज्वल केले, मराठी वाङ;्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी उपस्थित होते. प्रारंभी संदीप घोरपडे, दिनेश नाईक, डॉ.प्रज्ञा सोनगडकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.पाटील पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाने माणूस आभासी संवाद साधतो. त्यासाठी पुस्तके आपल्या जगण्याशी जोडली पाहिजेत. मात्र, मराठी गेली कुठे? असा महानगरांतून टाहो फोडत प्रश्न उपस्थित करणार्यांना हे साहित्य संमेलन सडेतोड उत्तर आहे. पुढच्या संमेलनात नवोदित साहित्यिकांना व्यापक स्वरुपात व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. पुस्तकांशिवाय आपण बरेच काही वाचले पाहिजे, असे ते म्हणाले. ए.एम.बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. संजय एकतारे यांनी आभार मानले.
माहिती, तंत्रज्ञानाचा प्रभाव विषयी परिसंवाद रंगला
‘आजच्या वाचन संस्कृतीवर माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर परिसंवाद रंगला. अध्यक्षस्थानी धुळे येथील जयहिंद महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.उषा पाटील होत्या. वाचनाची आवड असणार्यांची भूक भागविण्याचे काम तंत्रज्ञान करत असल्याचे संदीप पाटील (चोपडा) यांनी सांगितले. तंत्रज्ञानाला विरोध करण्यापेक्षा ते स्वीकारून स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे आहे. सध्या तरुणवर्ग वाचत नाही, हे असत्य आहे, असे प्रा.रमेश माने (अमळनेर) म्हणाले. वाचनाची माध्यमे बदलली तरी वाचनसंस्कृती टिकून राहते. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढत असल्याचे डॉ.संजीवकुमार सोनवणे (धरणगाव) यांनी सांगितले. आई आणि वडिलांमध्ये जो फरक आहे, तोच फरक पुस्तक माध्यमांमध्ये आहे. तंत्रज्ञान हे जसे वरदान आहे तसेच ते शापही आहे. सध्या या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होत असल्याचे प्रा.वि.द.पिंगळे (पुणे) यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषण प्रा.उषा पाटील यांनी केले. वाचनसंस्कृतीचे सोनेरी पान साने गुरुजींच्या ’श्यामची आई’ या पुस्तकाने लिहिले जावे, अशी इच्छा व्यक्त केली. जगणे हे पुस्तकवाचनाने आनंदी करता येते, असे त्यांनी सांगितले. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
नवोदित कवींचादेखील कवी कट्ट्यात सहभाग
मराठी वाड्ःमय मंडळ, र.का.केले सार्वजनिक वाचनालय आणि मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’मध्ये जिल्ह्यातील तब्बल 70 नवोदित कवींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हा कार्यक्रम अन्नपूर्णा मंगल कार्यालयातील ’कवी पुरुषोत्तम पाटील कवी कट्टा’वर रविवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी झाला. ग्रामीण, शहरी वास्तव जीवनावर आधारित अहिराणी आणि मराठी कवितांतून प्रकाशझोत टाकण्यात आला. सिंघवी परिवारातील दोन जाऊबाईंनीदेखील सहभाग घेऊन नवोदित मराठी कवींना प्रेरणा दिली. कविसंमेलनाचे उद्घाटन साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल (जळगाव) यांनी केले. या वेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्यावाचस्पती डॉ.रामचंद्र देखणे, स्वागताध्यक्ष उज्ज्वल केले, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ.वि.दा.पिंगळे, कांचन शहा, डॉ.सुषमा जोशी, प्रा.शीला पाटील, रमण पाटील, मराठी वाङ;्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, रमेश पवार उपस्थित होते.
जिल्ह्यातील तब्बल 70 कवींचा होता सहभाग
दिव्या चौधरी, विनोद बागुल, मीना सैंदाणे, रमेश धुरंधर, पी.जी.चौधरी, निंबा बडगुजर, अनुराधा सिंघवी, विद्या हजारे, रूपाली सिंघवी, अनुराधा सिंघवी, चिंधू वानखेडे, भाऊसाहेब पाटील, संजय सोनार, धनश्री मिस्तरी, प्रभात घोडेस्वार, मिलिंद कुडे, अजय केले, स्वाती अमृतकार, सारंग लोहार, जयंत काळकर, भागवत पाटील, निकिता देशमुख, स्वाती शिंदे, कविता काटे, मनोज पारधी, कल्पेश पाटील, सुनीता पाटील, राजेंद्र पारे, सारांश सोनार, भीमराव सोनवणे, बापूराव पाटील, तुषार पाटील, दिनेश चव्हाण, एन.आर.पाटील, शैलेंद्र बिरारी, डी.डी.पाटील, भागवत सूर्यवंशी, प्रभाकर शिरसाठ, श्रुती देशमुख, नयन पाटील, इंदुमती शिरसाठ, मंगला देशमुख, जयेश वाणी, वाल्मीक अहिरे, हिरामण कंखरे आदींनी सहभाग नोंदवला आहे.