जिल्हास्तरीय ‘सेल्फी विथ बाप्पा’ उपक्रम

0

नंदुरबार । येथील शिवाजी रोड परिसरातील नंदुरबार व्यायाम शाळेतर्फे गणेशोत्सवानिमित्त सेल्फी विथ बाप्पा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सर्वांसाठी खुला असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष गजेंद्रसिंग राजपूत यांनी केले आहे. प्रत्येकास सहभाग प्रमाणपत्र व उत्कृष्ठ सेल्फीला बक्षीस देण्यात येणार आहे.

एकापेक्षा जास्त सेल्फी पाठविणारा ठरणार बाद
विघ्नहर्ता गणरायाची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाचे औचित्य साधून नंदुरबार व्यायाम शाळेतर्फे जिल्हास्तरीय सेल्फी विथ बाप्पा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली असेल त्या ठिकाणी सहपरिवार, मित्र – मैत्रिणी किंवा वैयक्तिक स्वरुपात बाप्पा सोबत सेल्फी काढून 9765068080 या व्हॉट्सअप क्रमांकावर सेंड करून सहभाग नोंदविणे. सेल्फी पाठवितांना संपूर्ण नाव,गाव , पत्ता, मोबाईलक्रमांचा उल्लेख असावा. एका व्यक्तीने एकच सेल्फी सेंड करावा. एकापेक्षा जास्त सेल्फी पाठविल्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल. प्रवेश विनामूल्य असणार आहे. उपक्रमाचा कालावधी दि. 5 सप्टेंबर पर्यंत असेल. बाप्पा विथ सेल्फी उपक्रमासाठी विनोदकुमार बाफना यांचे सहकार्य लाभत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष गजेंद्रसिंग राजपूत यांनी केले आहे.