धुळे (ज्ञानेश्वर थोरात, योगेश जाधव) । उत्तर महाराष्ट विद्यापीठातर्फे यापूर्वी केंद्रस्तरीय युवारंग महोत्सव होत होता. परंतु, गेल्या काही वर्षात या महोत्सवात काही विशिष्ट महाविद्यालयांचे विद्यार्थी जिंंकायचे. परिणामी, खान्देशातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी चांगले कलागुण असूनदेखील त्यांना पारितोषिक मिळत नव्हते. या विचाराने उमविने जिल्हास्तरीय युवक महोत्सव घेण्याचे ठरविले. त्या माध्यमातून आदिवासी व ग्रामीण भागातूनही चांगले कलावंत घडू शकतात, अशी आशा उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी येथे व्यक्त केली. दरम्यान, येथे आयोजित युवारंग युवक महोत्सवात तरुणांनी त्यांच्यातील उत्कृष्ट कलाविष्कार सादर करीत धमाल केली.
यांची होती उपस्थिती
उत्तर महाराष्ट विद्यापीठ व श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाऊसाहेब ना. स. पाटील साहित्य व मु. फि. मु. अ. वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवारंग युवक महोत्सव 2017-2018 चा कार्यक्रम बुधवारी एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर युवक महोत्सवाचे कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील, एन. मुक्टोचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय सोनवणे, युवारंग युवक महोत्सवाचे निरीक्षक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, प्रा. विलास चव्हाण, उमविचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, अमोल मराठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, एन. संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, विद्यापीठ विद्यार्थिनी प्रतिनिधी अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्याने ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अश्पाक सिलकगर यांनी केले.
साहित्यिक व कलावंत समाजाला दिशा देण्याचे काम करतात
केंद्रस्तरीय युवक महोत्सवात पारितोषिक न मिळाल्याने ग्रामीण भागातून आलेली मुले हताश व्हायची. परंतु, आता जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक जरी एखाद्या संघाने मिळविला तरी त्याचा आनंद मुलांना राहणार आहे. समाजात असलेले साहित्यिक व कलावंत हे समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. त्यामुळे या महोत्सवात सहभागी झालेल्या कलावंतांनी कुठेही गालबोट लागणार नाही; याची काळजी घेतली पाहिजे. तसेच महोत्सवात सहभागी कलावंतांनी उत्कृष्ट कलाविष्कार सादर करावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. पाटील यांनी येथे केले.
ग्रामीण भागातील कलावंतांना संधी
युवारंग युवक महोत्सवात आज धुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील कलावंत त्यांचे कलाविष्कार सादर करणार आहेत. ग्रामीण भागातील कलावंतांमध्ये असलेले कलागुण या माध्यमातून समोर येणार आहेत. येथे कलावंतांना उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे चांगले कलावंत घडतील, घडणार असल्याचे युवारंग युवक महोत्सव समितीचे निरीक्षक डॉ. सत्यजित साळवे यांनी येथे केले.
जिल्हास्तरीय महोत्सवामुळे मुलींचा सहभाग वाढला
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की पूर्वी केंद्रीय युवक महोत्सवात दोन ते अडीच हजार विद्यार्थी सहभागी होत होते. या सर्व विद्यार्थ्यांना सांभाळताना आयोजकांची मोठी अडचण होत होती. तसेच बाहेरच्या जिल्ह्यात मुलींना त्यांचे पालक पाच दिवसही सोडत नव्हते. परंतु, जिल्हास्तरीय युवक महोत्सवामुळे सकाळी गेलेली आपली मुलगी सायंकाळी घरी परत येणार या विचाराने या महोत्सवात मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे विद्यापीठाने जिल्हास्तरीय युवक महोत्सव घेण्याचा निर्णय योग्यच ठरला.
जोश करा; पण होश ठेवा
आजचा दिवस हा खर्या अर्थाने तरुणांचा आहे. सर्व कलाविष्कारांसाठी तरुणांनी जोश ठेवा. मज्जा व धमाल करा. पण हे करत असताना होश कायम ठेवा. एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेला 109 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा महोत्सव यशस्वी करायचा आहे. गालबोट लागणार नाही; याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी येथे केले.
रंगमंच क्र.1
कै.आणासाहेब चुडामण पाटील रंगमंचावर बिडबन नाट्य,मुकनाटय,समूह लोक नृत्य, शास्त्रीय लोक नृत्य, लोकसंगीत हे कला प्रकार सादर झाल्या. बिडबन नाट्यात सोशल मीडिया अती वापर ,बेटी बचाओ बेटी पढाओ,राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, यासारख्या बिषयाला हात घालत प्रकाश टाकला, या प्रकारात आठ सघ सहभागी झाले होते. यानंतर मुकनाटय सादर झालीत .तर मुकनाटय सामाजिक प्रश्नाप्रश्नानावर भाष्य करणारा आले . यातही आठ महाविद्यालय संघाचा सहभाग होता. दुपारच्या सत्रातविद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेषभूषा धारण करत समूह नृत्य सादर केली. त्यात आदिवाशी सोगाट्या नृत्य, गोधळी नृत्य,आदिवासी पावरा नृत्य, गुजराथी गरबा दांडिया, सादर करत उपस्थितांची दाद मिळवली,या यात आठ महाविद्यालय संघाचा सहभाग होता. यानंतर शास्त्रीय नृत्यात विद्यार्थ्यांनी भारतीय लोकसंस्कृती अत्यंत लयबद्ध नृत्य आणि ,अभिनयव्दारे शास्त्रीय नृत्य सादर करित उपस्थितांची मने जिंकली, यात पाच विद्यार्थ्यांनी सहभाग होता.
आमच्या महाविद्यालय युवारंग महोत्सव होत आहे. याचा मला अभिमान आहे. जिल्हास्तरीय युवारंग महोत्सव विद्यार्थ्यांचा कला,गुणाना दाखविण्यासाठी एक हक्काच्या व्यासपीठ मिळाले मुळे तरुणांमध्ये उत्साहा दिसून येत आहे.
– आश्विनी पाटील,
विद्यार्थी प्रतिनिधी एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालय धुळे.
युवारंग महोत्सवात आम्ही खूप धमाल करित आहोत. आयोजन चांगले केले आहे. जिल्हास्तरिय युवारंग महोस्तव ही संकल्पना चांगली आहे .यामुळे अधिक सख्या मध्ये तरूणांना कला सादर करण्याची संधी मिळत आहे .
– निलेश देसले
एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालय,धुळे.
मी प्रथमच युवारंग महोत्सवात सहभाग घेतला आहे. आम्ही समूहात गोंधळी नृत्य सादर केले .आम्ही खूप धमाल, मस्ती केली यासारख्या कार्यक्रमातून आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी मिळते म्हणून मी आनंदी आहे.
– संदीप मगरे,शिदखेडा
आमच्या शहराती युवारंगचे आयोजन होत असल्याने आम्ही सगळेच मित्र,मैत्रीणी खूप एन्जॉय करित आहोत. मी यात सहभाग नोंदविला आहे. एकाहून सरस कला विद्यार्थी सादर करत आहे. यामुळे स्पर्धा पहायला मिळत आहे.
– निकीता पावनकर
पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे.
जिल्हास्तरीय युवारंग महोत्सव आयोजनमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची चांगली संधी मिळाली आहे. या वेळेस तरूणांचा सहभाग वाढला आहे. या सारख्या कार्यक्रम नियमित होने गरजेचे आहे.
– रोहित पवार
पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे.