जिल्हा अंधारात..! रात्रभर झोपच नाही..!

0

भाद्रपद हिटची झलक सुरु ; असह्य उकाड्याने नागरीक हैराण

नवापूर । शहरात गेल्या काही दिवसापासून तापमान वाढले असुन ऊन्हाचे चटके जाणवु लागले आहेत. या उकाड्याने नागरीक सकाळ पासुनच घामाघुम होत आहे. काल पुर्ण दिवस तीव्र उष्मा होता हवेचा पत्ता नाही. रात्री सकाळी ७ वाजता वीज पुरवठा खंडित होऊन पुर्ण जिल्हात बत्ती गुल झाली होती. दोंडाईचा व विसरवाडी १२३ के व्हीत बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. धुळे येथुन सप्लाय घेण्याचे प्रयत्न सुरु आहे असे सांगण्यात येत होते.

नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
रात्रभर लाईट नाही आणि वरुन तीव्र उन्हाने लोक हैराण झाले आहेत. विसरवाडी,नंदुरबार येथे मुसळधार पाऊस सुरु असल्याचे वृत्त मिळाले आणि रात्री आठ वाजता नवापुर शहरात मुसळधार पाऊस सुरु होऊन एक तास तो बरसला रातच रात्रभर वीज आली नाही. अनेकांचे इन्वेटर बंद पडले होते. सकाळी लोकांना पाणी मिळत नव्हते. वीज नसल्याने अनेक प्रभागात पाणी आले नसल्याची ओरड होती तर लाईट नसल्याने बोरींग मोटारी बंद होत्या. यामुळे अनेक प्रभाग पाण्याविना होते. अनेकांनी नगरसेवकांना फोन लावले असता ते नोट रिचेबल असल्याचे सांगण्यात येत होते.

नागरिकांनी व्यक्त केला संताप
विज पुरवठा सकाळी ९:३० वाजता सुरळीत झाला आणि सवार्ंचा जीवात जीव आला. मात्र तरी ही अनेक प्रभागात बोरींग मोटारी सुरु न केल्राने मोटार सुरु करण्यासाठी रहिवाशी फोन करत होते. मात्र नगरपालिका कार्यालयाचा फोनच कोणी उचलत नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. अनेक महिन्यानंतर असा बिकट व रात्रभर अंधार्‍यांत राहण्याचा प्रसंग नवापुरकरांनी अनुभवला. एक तास ढगांचा गडगडाट व वीजेचा कडकडाटने मुसळधार पाऊस झाला. रात्री उकाड्याने लोक झोपले नाही. वीज नाही, पाऊस मध्येच बंद पडला.