अमळनेर । नुकताच जळगाव जिल्हा अर्बन को-ऑप बँक असोशिएशन लि जळगावच्या 2017-2022 च्या झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अमळनेरचे माजी उपनगराध्यक्ष, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष व अर्बन बँकेचे विद्यमान संचालक लालचंद हेमंदास सैनानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील या बँकेशी संबंधित असलेल्या तालुक्यावरील बँकांमधून एक संचालकांची दरवर्षी निवड केली जाते.यंदा अमळनेरातील या बँकेतून दोन संचालकांना या बँकेच्या संचालक पदाचा बहुमान मिळाला आहे. यानिवडी बाबत तालुकाभरातून अभिनंदन होत आहे.